आयटीआय अभ्यासक्रमाला दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढतच चालली आहे. गेले चार-पाच वर्षांपासून आयटीआय अभ्यासक्रमाला जागा कमी मात्र विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यात काही ट्रेंड ला सर्वाधिक मागणी असते. असे असले तरी दरवर्षी काही महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जागांची मागणी वरिष्ठ स्तरावर करत असतात. असे असताना देखील विद्यार्थी संख्या सर्वाधिक दिसून येत आहेत.
महाविद्यालयांनी वरीष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत.
अनेक अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे मात्र काही अभ्यासक्रमाला जागा कमी मागणी मात्र सर्वाधिक असते. आयटीआय अभ्यासक्रमाला गेले चार-पाच वर्षांपासून जागा कमी आणि विद्यार्थ्यांचे अर्ज देखील सर्वाधिक असते. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता जागा वाढीसाठी प्रस्ताव देखील देण्यात येतात. त्यासाठी केवळ जगावाढीसाठी प्रस्ताव नव्हे त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आदी सुविधांचा देखील विचार करून प्रस्ताव दिला जातो. असे असताना देखील विद्यार्थी संख्या मात्र कमी झालेली नाही. यंदा औरंगाबाद मध्ये आयटीआय ला हजार आणि अर्ज मात्र 70 हजार आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात एकूण आयटीआयला 1 लाख 45 हजार 632 जागा आहेत. त्यासाठी अर्ज मात्र तीन लाख आले आहेत.
आयटीआय अभ्यासक्रमाला दरवर्षी काहीच ट्रेंडला मागणी सर्वाधिक दिसून येते. त्यामुळे काही ट्रेंडला सर्वाधिक अर्ज येतात. आणि काही ट्रेंडला मात्र जागा विद्यार्थी संख्या कमी दिसून येते. यामुळे देखील विद्यार्थी संख्या सर्वाधिक दिसून येत आहेत. इतकेच नव्हे तर एक विद्यार्थी अकरावीसह पॉलिटेक्निकबरोबर आयटीआय अभ्यासक्रमाला देखील अर्ज भरत असल्याने विद्यार्थीसंख्या जास्त असते.
लोकसंख्येच्या तुलनेत जागा मात्र कमीच
औरंगाबाद शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्येचा विचार केला तर दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमाला मागणी प्रचंड असते जागा मात्र कमी असतात. इतकेच नव्हे तर शहरातील औद्योगिकदृष्टीने विचार केला तर यात झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यादृष्टीने मनुष्यबळ देखील असणे आवश्यक आहे. आयटीआय पूर्ण करून अनेकांना रोजगारही मिळत आहे. मात्र मागणीनुसार आयटीआय अभ्यासक्रमाला जागा वाढणे आवश्यक असल्याची मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.